राज्याच्या हितासाठी आता निर्णय गरजेचा : एकनाथ शिंदे यांचे सूचक ट्विट


गुवाहाटी : शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे असल्याचे सूचक ट्विट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बुधवारी दिवसभरातील घडामोडींनंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधत शिवसेनेतील बंडखोर आमदारांना भावनिक साद घालत परत येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शिंदे यांनी ट्विट करीत भूमिका मांडली आहे.

अडीच वर्षात घटक पक्षांना फायदा
गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असून महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे, असे चार मुद्यांचे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केे आहे. याशिवाय या ट्विटला हिंदुत्व फॉरेव्हर असा हॅशटॅगही जोडला. एकनाथ शिंदेंची भूमिका पाहता, उद्धव ठाकरे यांनी साद बंडखोर आमदारांना अमान्य असून पक्ष प्रमुखांचा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



हिंदूत्व आमचा श्वास : मुख्यमंत्री
शिवसेना हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही म्हणूनच आदित्य एकनाथ शिंदे अयोध्येला गेले शिवाय हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री असून शिवसेना आणि हिंदूत्व एकच असून कधीही वेगवेगळे नाही. हिंदुत्व हा आमचा श्वास असून हिंदुत्वाबद्दल बोलणारा विधानसभेत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे, असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमधील संवादात म्हटले होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी पद सोडण्याची तयारी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !