निमगाव जवळ दोन ट्रकची समोरा-समोर धडकल्या : दोघे जखमी
यावल : भुसावळ रस्त्यावर निमगाव गावाजवळ दोन ट्रक आपसात धडकल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या अपघातात सुमारे तासभर वाहतूक खोळंबली तर दोन जण जखमी झाले तर अपघातानंतर जखमींना काढण्यासाठी निमगाव गावातील नागरिकांनी धाव घेतली व वाहतूक सुरळीत केली.
अपघातानंतर वाहतूक ठप्प
यावल-भुसावळ रस्त्यावर निमगाव हे गाव आहे. या गावाजवळ मंगळवारी रात्री भुसावळकडून मालवाहू ट्रक क्रमांक जी. जे. 01 जे. टी. 8580 हा यावल कडे येत होता तर यावल कडून भुसावळ कडे ट्रक क्रमांक जी.जे. 13 व्ही. 5092 हा जात होता दरम्या या दोघा ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर संपूर्ण रस्ता बंद पडला आणि दोन्ही बाजूंनी वाहतूक खोळंबली होती तेव्हा निमगाव गावातील नागरिक चिमन पाटील, कैलास कोळी, विनोद पाटील, श्रीराम कोळी, अमोल तायडे, पोलीस पाटील प्रमोद कोळी, सुनील कोळी यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली आणि ट्रक मध्ये फसलेले जखमी जितेंद्रसिंग वय 30 व श्याम बलबीरसिंग ठाकूर (18, दोघे रा.ढोलपूर राजस्थान) या दोघा जखमींना बाहेर काढले. व वाहतुक सुरळीत केली तसेच जखमींना 108 रूग्णवाहिकेचे लोकोपायलट प्रविण बारी, डॉ. इरफान खान यांनी तातडीने उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालय येथे आणले. दोघं ट्रक रस्त्याच्या मध्यभागी अपघातग्रस्त झाल्याने वाहतूक खोळंबली होती.पाऊस सुरू होता व पावसात देखील निमगाव गावातील नागरिकांनी मोठ्या शर्थीने मदत कार्य केले जखमींना मदतीचा हात देत समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.

