विवाहितेच्या गळ्यातून चोरट्यांनी अलगद मंगळसूत्र चोरले
Thieves Stole Algad Mangalsutra From The Neck Of The Married Woman जळगाव : बाजार करण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून 55 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी अलगद लांबवले. ही घटना जळगाव शहरातील पिंप्राळ्याच्या आठवडे बाजारात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
झन्ना मन्ना जुगार अड्ड्यावर धाड : पाच जुगारी जाळ्यात
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
जळगाव शहरातील मानराज पार्क परीसरातील विद्यानगर येथे हेमलता उमेश पाटील (20) या वास्तव्यास आहेत. बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पिंप्राळा येथील आठवडे बाजारात त्या आल्या असता हेमलता पाटील यांच्या गळ्यातील 15 ग्रॅमचे मंगळसूत्र हेमलता यांना कळू न देता अंत्यत शिताफीने चोरट्यांनी लांबवले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर हेमलता यांनी बाजारात शोध घेतला मात्र मंगळसूत्र मिळून आले नाही. चोरीची खात्री झाल्यावर हेमलता पाटील यांनी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे हे करीत आहेत.

