धुळ्यातील अवैध सावकारी प्रकरण : संजय बंबच्या लॉकरमधून 77 लाखांची रोकड जप्त
Illegal Lending Case In Dhule : Rs 77 Lakh Cash seized from Sanjay Bamb’s Locker धुळे : धुळ्यातील अवैध सावकारी प्रकरण सध्या राज्यात चर्चेत आले आहे. अटकेतील राजेंद्र बंबचा भाऊ तथा संशयीत संजय बंब व इतरांच्या लॉकरमधून पोलिसांनी सुमारे 77 लाख 93 हजारांची रोकड, दागिने जप्त केल्याने खळबळ उडाली आहे तर मुदत ठेवीच्या 260 पावत्या आढळल्या आहे. ब्लॅक मनी व्हाइट करण्यासाठी दुसर्याच्या नावे एफडी करण्यात आल्याचे उघड झाले असून जप्त 260 एफडीची मुदत ठेव रक्कम सुमारे 20 लाख रुपये असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
गोद्री येथे वृद्धेचा खून करून दागिने लांबवले : आरोपी जामनेर पोलिसांच्या जाळ्यात
लॉकर उघडताच सापडले घबाड
श्रीराम नागरी पतसंस्थेतील लॉकर उघडण्यात आले. त्यात 77 लाख 93 हजारांची रोकड, सात लाख 51 हजारांचे सुमारे 149 ग्रॅम सोने तसेच 490 कोरे चेक, 244 कोरे स्टॅम्प तसेच इतर व्यक्तीच्या नावावर असलेल्या सुमारे 260 मुदत ठेवीच्या पावत्या मिळून आल्या. त्यापैकी बहुतांशी एफडी या एकाच कुटुंबातील नागरीकांच्या नावे असून एफडीवर नावे असलेल्या नागरीकांना त्याची माहिती नाही. अवैध सावकारी-कर्ज वसुलीतून जमणारा ब्लॅक मनी व्हाईट करून घेण्यासाठी या एफडीचा उपयोग गेला जात होता. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी याबाबत माहिती दिली.

