सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या जानोरीच्या तरुणाचा वीज कोसळून जागीच मृत्यू
रावेर : तालुक्यातील जानोरी येथील 21 वर्षीय युवक सरपण गोळा करण्यासाठी शेत शिवारात गेला असतानाच वादळी वार्यासह सुरू असलेल्या पावसात वीज कोसळल्याने तरुणाचा मृत्यूझाला. ही घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. मुकद्दर कलिंदर तडवी (21) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो कुटुंबातील एकूलता एक असल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.
झाडाखाली थांबताच कोसळली वीज
यावल ग्रामीण रुग्णालयात रात्री उशीरा शवविच्छेदन झाले . मुकद्दर गुरुवारी दुपारी सरपण गोळा करण्यासाठी गेला होता. यावेळी अचानक वादळ व पाऊस सुरू झाला. मुकद्दर झाडाखाली थांबला. मात्र, काही वेळात वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच जानोरी सरपंच गंभीर तडवी, ग्रा.पं. सदस्य मनोज तडवी, राजू तडवी, संजय तडवी, मजीत तडवी यांनी त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला.

