सावदा शहरात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या


सावदा : शहरातील तडवी वाड्यातील प्रौढाने घरात दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. याबाबत सावदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शशिकांत मधुकर लोखंडे (41, तडवी वाडा, सावदा, ता.रावेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या जानोरीच्या तरुणाचा वीज कोसळून जागीच मृत्यू 

आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट
शशिकांत लोखंडे हे आपल्या पत्नी व तीन मुलांसह शहरातील तडवीवाडा भागात वास्तव्याला आहे. शुक्रवार, 24 जून रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी रेशन घेण्यासाठी गावात गेल्या असताना शशिकांत हे घरात एकटेच असताना त्यांनी दोरीने राहत्या घरात गळफास घेतला. त्यांची पत्नी रेशन घेवून घरी आल्यावर धक्कादायक प्रकार उघडकीला आला. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. शेजारच्यांच्या मदतीने लोखंडे यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत सावदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत शशिकांत यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परीवार आहे.



धुळ्यातील अवैध सावकारी प्रकरण : संजय बंबच्या लॉकरमधून 77 लाखांची रोकड जप्त 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !