जळगाव जिल्हा संघाचा टेनिस बॉल क्रिकेट राज्य स्पर्धेत सहभाग
भुसावळ : महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची 18 वी राज्यस्तरीय सब ज्युनिअर गटाची टेनिस बॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेला जालना येथे शुक्रवारपासून सुरूवात झाली. स्पर्धेत जळगाव जिल्हा संघाने सहभाग घेतला आहे. आरोग्यमंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी यांच्याहस्ते जालना विरुद्ध अहमदनगर सामन्याची सुरुवात टॉसने करण्यात आली. पावसामुळे सामना अनिर्णीत राहिला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे संघटनेचे सचिव डॉ.मोहम्मद बाबर, उपाध्यक्ष बाबूलाल धोत्रे, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे टेनिस क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, नाशिक जिल्ह्याचे सचिव मुकुंद झंन्कार, लक्ष्मण इंगळे, शम्स परवेज, आयोजनही कमिटीचे पदाधिकारी अक्षय पवार, बबन सुरटी, अॅड.अमजद पठाण, जालन्याचे सचिव चांद पी.जे., विविध जिल्हा संघटनेचे सचिव व खेळाडू या प्रसंगी उपस्थित होते.


राज्यातील 32 संघ सहभागी
स्पर्धेत राज्यभरातील 32 संघाने सहभाग घेतला असून स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात येत आहे. स्पर्धेतून उत्कृष्ट कामगिरी करणार्या खेळाडूंची निवड चेन्नई येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी केली जाणार आहे.
तत्पूर्वी खेळाडूंना मैदानात येणार्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन टोपे यांनी यावेळी दिले. दरवर्षी जालना येथे स्पर्धा योजना करण्याचे आयोजकांना सूचना त्यांनी केल्या.
जळगाव जिल्ह्याचा संघ असा
कर्णधार- शोन बोदडे, व्हिकेट किपर- तुषार बेहरानी, दिवेश पाटील, प्रथमेश पाटील, शोएब खान, प्रथमेश पाटील, समर्थ पाटील, कुणाल परदेशी, अथर्व डोंगरे, हर्षक वाघोदे, पियूष चव्हाण, पार्थ काबरा, वरुण सुशलाणी, ज्ञानेश राणे, यश राणे, जय जैन, प्रशिक्षक- तन्मय दाभाडे, व्यवस्थापक- अबुजर पटेल.