चहाचा व्यवसायाच्या नावाखाली तरुणाला तीन लाखांचा गंडा : आरोपी जाळ्यात


जळगाव : चहाचा व्यवसाय करण्याच्या नावाखाली एकाची तीन लाखात फसवणूक करणार्‍या संशयिताला गुवाहाटी येथून सायबर पोलिसांनी अटक केली. पप्पू खान पीर खान उर्फ साबीर खान उर्फ तौसिफ खान (मूळ रा.राजस्थान, ह.मु.गुवाहाटी, आसाम) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

जळगावातील वृद्धेला दहा लाखांचा गंडा : आरोपी जाळ्यात

व्यवसायाच्या नावाखाली फसवणूक
शहरातील शेरा चौकातील शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन (48) याने फेसबुकवर पीअरल टी कॉफी शाप नावाचे पेजच्या माध्यमातून तरुणाला चहाचा व्यवसाय करण्याच्या नावाखाली शेख अहमद यांची तीन लाख 805 रुपयात ऑनलाईन फसवणुक केली होती तसेच चहाची ऑर्डरसह फोन पे यासह ऑनलाईन पद्धतीने अ‍ॅडव्हान्स रक्कम घेवून त्यांनी चहाचा माल पाठविला नव्हता. फसवणूक झाल्याची खात्री होताच सायबर पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. त्यानुसार साबीर खान, पप्पू खान, तौसिफ खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.



तांत्रिक विश्लेषणाअंती आरोपी जाळ्यात
सायबर पोलिसांनी शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन यांनी पैसे पाठविलेल्या बँक खाते व संपर्क केलेल्या मोबाईलची संपुर्ण माहिती काढली. त्या माहितीचे दिलीप चिंचोले, गौरव पाटील, दीपक सोनवणे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन संशयिताला जेरबंद केले.

पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झालेला आरोपी अखेर अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !