Uddhav Thackeray उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले : स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा
Uddhav Thackeray clearly said: Ask for votes in the name of your Father मुंबई : हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा, असे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह बंडखोरांना सुनावले आहे. ते म्हणाले की, आधी नाथ होते, आता दास झाले. बंडखोरांनी त्यांचा निर्णय घ्यावा. बाळासाहेबांचं नाव दुसर्यांना वापरता येणार नाही. शिवसेना निखारा आहे. पाय ठेवाल तर जळून जाल, असे उद्धव ठाकरे शनिवारी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पदाधिकार्यांना उद्देशून भाषण करताना म्हणाले.
म्हणून माझ्यावर अधिक प्रेम
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा आपल्यावर शिवसेना कार्यकर्त्यांचं काकणभर जास्तच प्रेम आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून अनेकांना मी सांगतो. तुम्ही हसाल. पण जर शिवसैनिकांना विचारलं तर तो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांपेक्षा माझ्यावर काकणभर जास्तच प्रेम करत असेल. कारण केवळ मी त्यांचा मुलगा आहे म्हणून, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


उद्धव ठाकरेंनी सांगितली ‘ती’ आठवण
उद्धव ठाकरेंनी यावेळी त्यांची पक्षप्रमुख पदावर निवड झाली तेव्हाची आठवण सांगितली. तेव्हा पक्षांतर्गत नाराजीविषयी बोलताना बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली भूमिका त्यांनी सांगितली. मी बाळासाहेबांना म्हणालो हे सगळे काय करतायत ते तुम्ही तरी थांबवा. ते मला म्हणाले मी मध्ये नाही पडणार. त्यांचा निर्णय त्यांना घेऊ दे. मग शेवटी तो ठराव मंजूर झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी सगळ्यांना विचारलं होतं की हे जे सगळं केलंय, ते तुम्हाला मान्य आहे का? असे उद्धव ठाकरे म्हणाले.