शिवसेना पुर्नबांधणीसाठी संपर्क प्रमुख विलास पारकर जिल्ह्यात

शिवसेनेच्या बैठकांसह मेळाव्याचे आयोजन : जिल्हाप्रमुख समाधान महाजन


भुसावळ : शिवसेनेत झालेल्या राजकीय बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईत शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक नुकतीच घेतली. या बैठकीत भुसावळ विभागाचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्यासह जिल्ह्यातील जिल्हाप्रमुखांनी हजेरी लावली. बैठकीत दिलेल्या सूचनेप्रमाणे आता पक्षाची पूर्नबांधणी केली जात असून त्यानुषंगाने भुसावळ विभागात कार्यकर्ता मेळावा, बैठकांचे सत्र रविवार, 26 जूनपासून सुरू होत आहे. रावेर लोकसभा शिवसेना संपर्क प्रमुख विलास पारकर त्यासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

भुसावळातील ब्राह्मण संघात आज बैठक
भुसावळ विधानसभेतील शहर व तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना रावेर लोकसभा शिवसेना संपर्क प्रमुख विलास पारकर, विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश राणे आणि जिल्हाप्रमुख समाधान महाजन रविवारी सायंकाळी पाच वाजता मार्गदर्शन करतील. शहरातील बाजार वार्डातील ब्राह्मण संघात ही बैठक होत आहे. भुसावळ शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, रेल कामगार सेना, अल्पसंख्याक आघाडी, शिक्षक सेना, दिव्यांग सेना, एस टी कामगार सेना, ग्राहक संरक्षण कक्ष पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिकांना उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.



विधानसभानिहाय कार्यक्रम असे
रविवारी सकाळी 9 वाजता चोपडा विधानसभा, दुपारी 11 वाजता रावेर विधानसभा, दुपारी एक वाजता मुक्ताईनगर विधानसभा, दुपारी 3 वाजता जामनेर विधानसभा व संध्याकाळी 5 वाजता भुसावळ विधानसभेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. भुसावळ व चोपडा विधानसभेच्या बैठकीला जिल्हाप्रमुख समाधान महाजन उपस्थित राहतील. भुसावळ बैठकीनंतर पत्रकार परीषदेचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.

पक्षाची पूर्नबांधणी करू : समाधान महाजन
मुंबईतील सेना भवनात शुक्रवारी झालेल्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत शिवसेनेचे नेते विनायक राऊत, नीलम गोरे, आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. शिवसेनेच्या पक्षीय पूर्नबांधणी केली जाणार आहे. रविवारपासून या माध्यमातून संपर्क मेळावे, बैठका घेतल्या जातील. पदाधिकारी, कार्यकर्ता पक्षासोबत कायम आहे. तो अखेरपर्यंत शिवसेनेसोबतच राहिल, असे जिल्हाप्रमुख समाधान महाजन म्हणाले.

उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले : स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !