भुसावळ विभागात ‘फुकट्या’ रेल्वे प्रवाशांवर कारवाईची संक्रांत

विना तिकीट प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाशांविरोधात धडक मोहिम : कारवाईने खळबळ


भुसावळ : फुकट्या रेल्वे प्रवाशांमध्ये रेल्वेच्या महसुलावर मोठा परीणाम होत असल्याने अशा प्रवाशांविरोधात रेल्वेने मोहिम उघडत धडक कारवाईला सुरूवात केली आहे. 180 तिकीट तपासणीस यांना सोबत घेत 140 आरपीएफ कर्मचार्‍यांनी 46 रेल्वे गाड्यांची तपासणी करीत फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी विभागातील सर्वच स्थानकावर तिकीट तपासणीस यांनी तिकीटे तपासल्याने खळबळ उडाली तर या कारवाईत सातत्य राखण्याची मागणी होत आहे.

30 पथकांद्वारे तपासणी
डीआरएम एस.एस.केडीया यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे, आरपीएफ आयुक्त क्षितीज गुरव यांनी शनिवरी सकाळी सहापासूनच रेल्वे स्थानकांवर तळ ठोकला. यावेळी सकाळी बडनेरा जाणारी मेमू, महाराष्ट्र एक्स्प्रेस, ईगतपुरी शटल आदी 46 गाड्यांमध्ये व रेल्वे स्थानकांवर तिकीट तपासणी केली. यावेळी आरपीएफ व वाणिज्य विभागाचे तिकीट निरीक्षक यांचे संयुक्त 30 पथके तैनात होते. अचानक सुरू असलेल्या तिकीट तपासणीमुळे विविध रेल्वे स्थानकावर उतरणार्‍या फुकट्या प्रवाशांमध्ये भीती पसरली.



या स्थानकांवर झाली तपासणी
रेल्वेच्या संयुक्त पथकाकडून विभागातील नाशिक, मनमाड, भुसावळ, खंडवा, अकोला, बडनेरा या स्थानकांवर अचानक तिकीट तापणी करण्यात आली.तसेच खंडवा ते ईगतपुरी या विभागात पथके तैनात होती. यात अमरावती , चाळीसगाव, धुळे, जलंब, खामगाव या स्थानकांवर सुध्दा तपासणी करण्यात आली.

अजूनही होणार तपासणी
बुधवार, 29 जुनपासून जनरल तिकीट खिडक्या सुरू केल्या जात आहेत्यामुळे रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी राहणार असून याच गर्दीचा फायदा घेत अनेक जण विना तिकीटानेच प्रवास करीत असल्याने मोहिम नियमित सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. संयुक्त तपासणी मोहिमेमुळे फुकट्या प्रवाशांमध्ये भीती पसरली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !