प्रवाशांना मोठा दिलासा : अडीच वर्षांनंतर 10 जुलैपासून धावणार भुसावळ-हुतात्मा एक्स्प्रेस


भुसावळ : कोरोनाच्या काळात बंद झालेली भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस 10 जुलैपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार असल्याने प्रवाशांच्या गोटातून समाधान व्यक्त होत आहे. गाडी सुरू करण्याबाबत लोकप्रतिनिधींसह प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे आग्रह धरला होता.

प्रवाशांना मोठा दिलासा
भुसावळ येथून थेट पुणे जाणे आता प्रवाशांसाठी सोयीचे ठरणार आहे. कोरोनाचे संकट कमी होताच रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्या पूर्ववत सुरू केल्या मात्र हुतात्मा एक्स्प्रेस सुरू होत नसल्याने नाराजी व्यक्त होत होती. ही गाडी नाशिक, ईगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, खंडाळामार्गे पुण्याला जात असल्याने प्रवाशांना अत्यंत सोयीची होती. आता 10 जुलैपासून हुतात्मा एक्स्प्रेस सुरू होत असल्याने प्रवाशांच्या वेळेसह खर्चात मोठी बचत होणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !