भातखेड्यातील तरुण दोन गावठी कट्ट्यासह एलसीबीच्या जाळ्यात
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची भातखेडा गावात कारवाई
जळगाव : एरंडोल तालुक्यातील भातखेडा गावातील तरुणाला दोन गावठी पिस्टलासह अटक करण्यात आली. चेतन गोविंदा पाटील (20, भदाणे) (वय-20) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तरुणाकडे गावठी पिस्टल असल्याचीम माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस उपनिरीक्षक अमोल देवडे, अशरफ शेख, सुनील दामोदरे, दीपक पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, राहुल बैसाने, अशोक पाटील, ईश्वर पाटील यांचे पथक रविवार,26 जून रोजी दुपारी रवाना केले. पथकाने संशयित आरोपी चेतन गोविंदा पाटील याला अटक केली असून त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे दोन गावठी बनावटीचे पिस्तूल हस्तगत केले आहे. याबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

