Add.Rohini Khadse अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्या ट्विटची राज्यभरात चर्चा


Add.Rohini Khadse जळगाव : शिवसेनेला हादरा देत एकनाथ शिंदे व बंडखोरांनी आमदारांनी वेगळी चूल मांडत आता भाजपासोबत सरकार स्थापण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात नवनवीन घडामोडीत घडत असतानाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या अ‍ॅड.रोहिणी खडसेंनी आपल्या ट्विटर हँडलसह फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी ‘आयुष्यात एकच नियम पाळा ज्यांनी जिंकायला शिकवलं, त्यांना हरवण्याची स्वप्ने कधीच पाहू नका’ अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे. अ‍ॅड.रोहिणी डसेंच्या याच ट्विटची राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

बंडखोर आमदारांवर साधला निशाणा
अ‍ॅड.रोहिणी खडसे (Add.Rohini Khadse) यांनी केलेल्या ट्विटमधून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या संकटाच्या काळात शिवसेनेसोबत असल्याची भूमिका जाहीर केली आहे. या सार्‍या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी केलेल्या ट्विटचे राजकीय अर्थ लावले जात आहेत.



भुसावळ विभागात ‘फुकट्या’ रेल्वे प्रवाशांवर कारवाईची संक्रांत


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !