शेवगे येथील नुकसानीची अॅड.रोहिणी खडसेंकडून पाहणी
बोदवड : तालुक्यातील शेवगेसह परीसरात वादळी पावसामुळे घरांसह जनावरांच्या गोठ्यांचे व शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी रविवारी शेवगे येथे भेट देऊन नुकसानी पाहणी केली.
महसूल प्रशासनाशी साधला संपर्क
राजाराम सुलताने यांच्या गोठ्याची, शेवगे शिवारातील शेतीची व पडझड झालेल्या घरांच्या नुकसानीची पाहणी यावेळी करण्यात आली. नुकसानीचे पंचनामे करून शेतकरी बांधवांना तत्काळ मदत उपलब्ध करून द्यावी यासाठी
महसुल यंत्रणेशी संपर्क साधण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत (आबासाहेब) पाटील, मधुकर राणे, रामदास पाटील, किशोर गायकवाड, भरत अप्पा पाटील, भागवत टिकारे, वामनराव ताठे, प्रदीप बडगुजर, डॉ.ए.एन.काजळे, शिवाजीराव ढोले, प्रमोद फरफट, सतीश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रामराव पाटील, विजय चौधरी, नईम खान बागवान, पिंटू पाटील, निलेश माळी, एकनाथ खेलवाडे आणि शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

