वेध गणेशोत्सवाचे : भुसावळातील जय मातृभूमी मंडळाच्या बाप्पाची बुकींग


भुसावळ : गणेशभक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून गेल्या दोन वर्षानंतर कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर यंदा होणार्‍या गणेशोत्सवाच्या नियोजनावर गणेशभक्तांनी भर दिला आहे. भुसावळातील मानाचा गणपती व खान्देशचा राजा असलेल्या जय मातृभूमी मंडळाच्या बाप्पाची बुकिंग नुकतीच करण्यात आली. बर्‍हाणपूर शहरातील सुप्रसिद्ध मूर्तिकार वैद्य सन्स यांच्याकडे रविवारी बाप्पाची मूर्ती बुक करण्यात आली असून प्रसंगी मूर्तीकाराचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व जय मातृभूमी मंडळाचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !