लग्नाच्या आमिषाने तरुणीवर दोन वर्ष बलात्कार
सिडको : मुलीच्या अज्ञान पणाचा फायदा घेऊन तू मला खूप आवडतेस, तुझ्याशीच लग्न करील, असे सांगून आरोपी तरुणाने सलग दोन वर्ष पीडीतेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी अंबड पोलीस ठाण्यात आरोपी अजीत चंद्रकात भोर (23, आहुली, ता.इगतपुरी, जि.नाशिक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ओळखीचा फायदा घेत अत्याचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या वडिलांनी संशयिताविरोधात फिर्याद दिली. आरोपी अजीत भोरने पीडितेसोबत सलग तीन ते अडीच वर्षांच्या कालावधीत शारीरिक संबंध ठेवत गेल्या तीन वर्षांपासून लग्न न करता तिच्यावर शारीरीक अत्याचार केले. पीडित मुलगी राहत असलेल्या ठिकाणी संशयित आरोपी अजित भोर याने 2020 पासून ते 24 जून 2022 या कालावधीत वेळोवेळी शरीर सबंध ठेवले तसेच त्याला जशी इच्छा होईल त्यावेळेस पीडित मुलीबरोबर शरीर संबंध ठेवण्यासाठी तिला फोन करून प्रवृत्त केल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीतून केला आहे. त्यानुसार पोलिसांनी अजित भोर याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

