कुटुंब झोपले असताना पाचोर्यात चोरट्यांचे काम फत्ते : साडेचार तोळे वजनाचे दागिने चोरीला
पाचोरा : कुटुंबातील सदस्य घरात झोपेत असतांना अज्ञात चोरट्यांनी साडेचार तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. हा प्रकार भडगाव रोडवरील राजराजेश्वरी कॉलनीत घडला. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते.
बेताल वक्तव्याचा निषेध : सावद्यासह मुक्ताईनगरात खासदार राऊतांच्या पुतळ्याचे दहन
जंगलातून आले चोरटे
पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील शक्तीधाम जवळ राहत असलेल्या व रेल्वे उड्डाणपूला जवळील महाराजा स्टाईलचे संचालक पंकज प्रमोद पाटील यांचे निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी पाचशे रुपये रोख रकमेसह साडेचार तोळे सोन्याचे दागिने लंपास केले यावेळी पंकज पाटील हे व त्याची पत्नी हॉलमध्ये तर त्यांचे लहान बंधू वरच्या मजल्यावर झोपलेले होते पंकज पाटील यांचे घराच्या मागच्या बाजूला जंगल असून त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मागील बाजूने येवून दरवाजाची कडी आतून लावलेली असल्याने त्या दरवाजास हाताचे बोट जाईल ऐवढे होल पाडून बोटाने कडी सरकवली व त्याच रुममध्ये असलेले कपाट फोडून कपाटातील कपडे अस्तव्यस्त करून लॉकर मधे असलेले साडेचार तोळे सोने व एका पर्स मध्ये असलेले 500 रुपये काढुन पर्स त्याच ठिकाणी तर सोन्याच्या रिकाम्या डब्या घरापासून सुमारे 25 फुट अंतरावर असलेल्या जागी रिकाम्या डब्या फेकुन पळ काढला.


मध्यरात्री चोरी उघडकीस
रात्री दिड वाजेच्या दरम्यान त्यांच्या बहिणीच्या मुलीला पाण्याची तहाण लागल्याने बहिण ही पाणी घेण्यासाठी गेली असता तिला दरवाजा उघडा दिसला व घरात चिखलाने माखलेल्या बुटाच्या खुना आढल्याने सदरची चोरीची घटना उघडकीस आली.