शाळेच्या विद्यार्थांची ओव्हरसीट वाहतूक : वाहनधारकांना समज
रावेर : रावेर शहरातील खाजगी शाळांमध्ये अॅपेरीक्षा, टाटा मॅजिक व ओमनी गाडीतून शाळेच्या विद्यार्थ्यांची ओव्हरसीट वाहतूक करणार्या पाच वाहनांची स्टेशन डायरीला नोंद घेऊन समज देऊन रावेर पोलिसांनी सोडून दिले आहे. दरम्यान, अशाच पद्धत्तीने यापुढे वाहतूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर कायदेशीररीत्या कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
अवैध वाहतुकीमुळे चिमुकल्यांचा जीव धोक्यात
रावेर शहराला लागून अनेक खाजगी शाळा आहेत. येथे शिक्षण घेण्यासाठी रावेर शहरासह खेड्यावरून मोठ्या प्रमाणावर शाळेचे विद्यार्थी अॅपेरीक्षा, टाटा मॅजिक व ओमनी गाडीतून येतात परंतु या वाहनांमध्ये विद्यार्थी वाहतुकीचे अटी-शर्तीचे सर्व नियम डावलले जातात. या संदर्भात पोलिस हेड कॉस्टेबल भागवत धांडे यांनी रावेर शहरात ओव्हरसीट शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या पाच वाहनांची स्टटेशन डायरीला नोंद घेऊन समज देऊन सोडून दिले. यापुढे नियमबाह्यपणे विद्यार्थ्यांची वाहतूक होताना आढळल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिस निरीक्षक कैलास नागरे, सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक, हवालदार भागवत धांडे, मुकेश सोनवणे यांनी केले आहे.

