अयोध्यानगरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या


जळगाव : शहरातील अयोध्यानगर भागातील रहिवासी प्रमिलाबाई नरेंद्र अस्वाल (45) यांनी रविवार, 26 रोजी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मुलाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात हलवला होता. प्रमिलाबाई यांनी आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

एमआयडीसी पोलिसात नोंद
मयत विवाहितेच्या पश्चात पती व दोन मुले असा परीवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास किरण पाटील करीत आहे.



नांदगाव येथील 11 वर्षीय मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !