किनगावच्या वृद्धेचा खून : आरोपी अखेर एलसीबीच्या जाळ्यात
Kingao Old Man’s Murder : Accused Finally Caught By LCB यावल : तालुक्यातील किनगाव येथील मराबाई सखाराम कोळी (75) या वृद्धेच्या खून प्रकरणी गावातीलच 30 वर्षीय आरोपीला जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. बाळू उर्फ मुकुंदा बाबुलाल लोहार (30) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, आरोपीने आणखी काही गुन्हे केल्याची दाट शक्यता असून त्या दृष्टीने त्याबाबत चौकशी सुरू आहे.
चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यातील किनगावच्या जखमी वृद्धेचा मृत्यू


हल्ल्यात वृद्धेचा ओढवला मृत्यू
किनगावातील आत्माराम नगरात 75 वर्षीय वृद्ध मराबाई कोळी या एकट्याच वास्तव्यास होत्या. 23 मे रोजी रात्रीच्या सुमारास आरोपीने वृद्धेवर हल्ला करीत हातातील चांदीच्या पाटल्या हिसकावल्या होत्या व हल्ल्यानंतर जखमी झालेल्या मराबाई यांचा 31 मे 2022 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी यावल पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एलसीबीने उघडकीस आणला गुन्हा
गुरुवार, 23 जून रोजी जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी स्वत: घटनास्थळ गाठून तपासाच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, यावलचे उपनिरीक्षक विनोद खांडबहाले व सहकार्यांनी किनगावातील बाळू उर्फ मुकुंदा बाबूलाल लोहार याला ताब्यात घेतले.