जळगावसह धुळे व नाशिक जिल्ह्यातून चोरलेल्या दहा दुचाकींसह त्रिकूट पोलिसांच्या जाळ्यात


Three Two-Wheelers Stolen from Jalgaon, Dhule and Nashik Districts Were Caught By The Police धुळे : जळगावसह धुळे व नाशिक जिल्ह्यातून चोरलेल्या तब्बल दहा दुचाकींसह त्रिकूटाला धुळे तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. योगेश शिवाजी दाभाडे (रा.बळसाणे, ता.साक्री), अंकुश एकनाथ शिरसाठ (रा. डकी, ता.चाळीसगाव) व विजय साईनाथ चव्हाण अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. बोरकुंड येथील दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान योगेश दाभाडे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर एक-एक कडी उलगडली.

आतापर्यंत दहा दुचाकी जप्त
दुचाकी चोरट्यांनी या दुचाकी धुळे तालुका, शहर, आझाद नगर, देवपूर पोलिस ठाण्याची हद्द, पारोळा, पिंपळगाव बसवंत, गंगापूर, सरकारवाडा व अमळनेर येथून लांबवण्यात आल्याची कबुली दिली आहे. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पथकाचे कौतुक केले आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक सागर काळे, कर्मचारी प्रवीण पाटील, नितीन दिवसे, अविनाश गहिवड, धीरज सांगळे, कुणाल शिंगाणे, कांतीला शिरसाठ, राकेश मोरे, प्रमोद पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.



आरोपीला 29 पर्यंत कोठडी
योगेश सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. चोरीनंतर तो मोबाइल व ठिकाण सतत बदलत असतानाच त्याला अटक करण्यात आली. आरोपींना 29 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सांगली जिल्ह्यातील ‘त्या’ नऊ जणांची आत्महत्या नव्हे तर हत्याकांड


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !