सीमकार्ड बंद होणार असल्याची थाप मारत जळगावातील डॉक्टरांना 24 हजारांचा गंडा


Fraud of 24,000 doctors in Jalgaon  जळगाव : खाजगी हॉस्पीटलमध्ये प्रॅक्टीस करणार्‍या डॉक्टरांना सायबर चोरट्याने सीमकार्ड बंद होणार असल्याची थाप मारत 24 हजार 900 रुपयात गंडवले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल करयात आला.

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले
महावीर नगरातील रहिवासी कुणाल सुरेश चौधरी हे एका खाजगी हॉस्पीटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवार, 24 रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या मोबाईलच्या व्हॉट्सपवर ‘सिम 24 तासात बंद होणार आहे, तर त्वरित खालच्या नंबरवर संपर्क साधा’ असे मेसेज आला. त्यावर त्यांनी संपर्क केला असता त्यांच्या बँक खात्यातून 24 हजार 900 रूपये ऑनलाईन पध्दतीने कमी झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.



जळगावसह धुळे व नाशिक जिल्ह्यातून चोरलेल्या दहा दुचाकींसह त्रिकूट पोलिसांच्या जाळ्यात 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !