Eknathrao Khadse राज्यातील आघाडी सरकार कोसळणार का ? माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले ‘जय श्रीराम’


Former Minister Eknathrao Khadse जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले असताना व ते केव्हाही कोसळण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांना जळगावात माध्यमांनी सरकार कोसळणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी ‘जय श्रीराम’ असे संबोधून या विषयावर बोलणे टाळले.

नशिराबादजवळील भीषण अपघात ट्रकचा टायर फुटल्याने ? : मयत जळगाव जिल्ह्यातील रहिवासी

खडसेंना ‘त्या’ प्रश्नावर बोलणे टाळणे
राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या मंगळवारी बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या आमदारांचा आकडा सतत वाढत गेला आहे. बुधवारी राज्यात मोठ्या घडामोडींची शक्यता वर्तवली जाते आहे. अशा संभ्रमाच्या वातावरणात राष्ट्रवादीकडून विशेष खबरदारी घेतली जाते आहे. नुकतेच विधान परिषदेत निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknathrao Khadse) हे मुंबईहून जळगावात दाखल झाले. सायंकाळी ते मुक्ताईनगरकडे रवाना झाले. तत्पूर्वी पत्रकारांनी त्यांना ‘हे सरकार कोसळेल का?’ असा प्रश्न केला; परंतु त्यावर त्यांनी केवळ ‘जय श्रीराम’ एवढेच म्हणत अधिक बोलणे टाळले. एरवी प्रत्येकवेळी आपली मत मनमोकळे मांडणारे खडसे यांच्या ‘जय श्रीराम’ म्हणण्यामागे नेमका काय हेतू होता? राज्यात भाजप सत्तेत येत असून, पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होत आहेत का? असा तर्क त्यांच्या या उत्तरातून लावला जात आहे.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !