जळगावात औषध विक्रेत्याला साडेतीन लाखांचा गंडा
A drug dealer in Jalgaon was robbed of Rs 3.5 lakh जळगाव : मेडीकल दुकान चालवणार्या दोघांनी होलसेल विक्रेत्याची तीन लाख 67 हजार 400 रुपयांत फसवणूक केली. याप्रकरणी मंगळवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
राज्यातील आघाडी सरकार कोसळणार का ? माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले ‘जय श्रीराम’
औषध विक्रेत्याला गंडा
सुनील रामदास भंगाळे (वय 54, रा. ओंकारनगर) यांचा मेडिकलचा व्यवसाय आहे. मॅक्स हॉस्पिटलचे डॉ. चरणसिंग जयसिंग चव्हाण व मोहंमद हानीफ शेख मेहमूद या दोघांचे हॉस्पिटमध्येच मेडिकल आहे. या मेडिकलसाठी 16 ऑगस्ट 2021 पासून भंगाळे यांच्या होलसेलच्या दुकानातून औषधी खरेदी केल्या. त्यांचा विश्वास संपादन करून पैसे नंतर देण्याचे ठरवले. यानंतर वेळोवेळी त्यांनी औषधी खरेदी केली. दोघांवर 3 लाख 67 हजार 400 रुपयांची उधारी झाली होती. यामुळे भंगाळे यांनी पैसे मागितले व दोघांनी पैसे देण्याचे कबूल करीत सव्वा लाख रुपयांचा धनादेश दिला. हा धनादेश वटला नाही. त्यामुळे भंगाळे यांनी पुन्हा पैशांसाठी तगादा लावला.


शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी
16 जून रोजी भंगाळे त्यांना मेडिकलवर भेटण्यासाठी गेले तेव्हा दोघांनी शिवीगाळ करुन त्यांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. दोघांनी आपली फसवणूक केल्याच निष्पन्न झाल्यानंतर अखेर मंगळवारी भंगाळे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर तपास करीत आहेत.