अंकाई किल्ला-मनमाड मार्गाचे दुहेरी-विद्युतीकरणाचे काम पूर्ण
भुसावळ : अंकाई किल्ल्यापासून मनमाडपर्यंत आठ किलोमीटर दुहेरी विभागाचे निरीक्षण मंगळवारी मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी केले. यावेळी या मार्गावरून सीआरएम स्पेशल गाडी वेगात चालवण्यात आली तसेच अंकाई किल्ला ते मनमाड या आठ किमी मार्गाची मोटार ट्रॉलीने तपासणी करण्यात आली. दुपारी 12.45 वाजता पथक मनमाडला पोहोचले.
राज्यातील आघाडी सरकार कोसळणार का ? माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले ‘जय श्रीराम’
स्पीड ट्रायल यशस्वी
मनमाड ते अंकाई दरम्यान स्पीड ट्रायल घेण्यात आली. यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी निर्माण मनोज शर्मा, मुख्य प्रधान विद्युत अभियंता गोपाल चंद्रा, डीआरएम एस.एस.केडिया आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

