भरधाव इनोव्हाने दुचाकीला उडवल्याने माळपिंप्रीतील दोघे मित्र ठार


जामनेर : सुनसगाव फाट्याजवळ समोरुन येणार्‍या इनोव्हा गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने माळप्रिंप्रीतील दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. जीवन शिवाजी कोळी (25) व विकास संजय पाटील (27)अशी मयतांची नावे असून बुधवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला जळगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

जळगावात औषध विक्रेत्याला साडेतीन लाखांचा गंडा

दोघा मित्रांचा जागीच मृत्यू
सूत्रांच्या माहितीनुसार, जीवन कोळी व विकास पाटील दोघे जिवलग मित्र होते. सुखा-दुखात सोबत राहणारे होते मात्र पहूरकडे येत असताना कु्रर काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघाताची माहिती मिळताच आरोग्यदूत जालमसिंग राजपूत, तुकाराम निकम, नाना भोजने, कमलाकर पाटील आदी कार्यकर्त्यांनी धाव घेत मदतकार्य केले.



भुसावळातील 23 वर्षीय विवाहितेची आत्महत्या 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !