Shri Vivek Phansalkar appointed the new Mumbai Police Commissioner मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी विवेक फणसळकर


1989 batch IPS Officer Shri Vivek Phansalkar appointed the new Mumbai Police Commissioner मुंबई : राज्यातील ठाकरे सरकार अल्पमतात आले असतानाच मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांचा कार्यकाळ गुरुवार, 30 जून रोजी संपत असल्याने मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी विवेक फणसळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी राज्यपालांच्या आदेशाने ही निवड केली आहे.

शिस्तप्रिय व प्रामाणिक अधिकारी
विवेक फणसळकर हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकात अतिरिक्त महासंचालक म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली आहे. आणि त्यापाठोपाठ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखपदीही ते होते. कडक शिस्त आणि प्रामाणिकपणा या त्यांच्या गुणांमुळे ते खात्यात ओळखले जातात.



ठाण्यातही केले काम
फणसळकर यांची 31 जुलै 2018 रोजी ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत राज्य शासनाने त्यांची बदली न करता मुदतवाढ दिली होती. सुमारे पावणे दोन वर्ष त्यांनी ठाणे शहर आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !