उदयपूरातील टेलर कन्हैयालाल हत्याकांडाचे पाकिस्तान कनेक्शन


उदयपुर : संपूर्ण देशाला हादरवणारी घटना उदयपूरमधून समोर आली आहे. टेलर कन्हैया लाल यांची निर्घृणपणे हत्या झाल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. कन्हैयालाल (50) यांची तालिबानी पद्धतीने गळा चिरून हत्या करणार्‍या रीयाज अत्तारीचे धागेदोरे दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या (आयएस) रीमोट स्लीपर सेल अलसुफाशी जोडले आहेत. एनआयएच्या वरीष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, रीयाज 5 वर्षांपासून अलसुफासाठी उदयपूर व आसपासच्या जिल्ह्यांत काम करत होता. आधी तो मुजीबच्या हाताखाली होता. तो आपल्या भागात अडीच महिन्यांपासून अलसुफाचे नेतृत्व करत होता. मुजीब सध्या तुरुंगात आहे.

चाकूचे 26 वार करीत केली हत्या
गुन्हेगारांनी कन्हैयाच्या शरीरावर चाकूने अनेक वार केले. यादरम्यान त्यांनी त्याच्यावर 26 वार केले, ज्यामध्ये त्याचे शरीर 13 वेळा गंभीरपणे कापले गेले. या धक्कादायक खुलाशानंतर निषेधाचा सूर आणखी तीव्र झाला आहे. प्रत्यक्षात हत्येचे दोन्ही आरोपी झब्बा शिवायचा आहे, असे सांगून कन्हैयाच्या दुकानात आले होते. कन्हैयाने माप घेण्यास सुरुवात करताच त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला करण्यात आला व त्याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला.



आरोपींचे कराची कनेक्शन
हत्याकांडामध्ये अटक करण्यात आलेल्या दोनही आरोपींचा पाकिस्तानशी संबंध असल्याचे उघड झघाले आहे. आरोपी रीयाझ स्वतः आयएसचा कार्यकर्ता आहे. त्याच्या फेसबुक फोटोंमध्ये तो जगभरातील इस्लामिक स्टेटच्या कार्यकर्त्यांद्वारे वापरल्या जाणार्या बोटांच्या संकेतांचा वापर करताना दिसतो. त्यामुळे त्याने दहशतवादी ट्रेनिंग घेतलं असल्याचाही संशय आहे.

राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांत निदर्शने
राजस्थानच्या उदयपूरमध्ये झालेल्या तालिबानी घटनेत टेलर कन्हैयालाल यांच्या हत्येनंतर संपूर्ण राजस्थानात तणाव आहे. राज्यात नेटबंदी असूनही अनेक जिल्ह्यांत विरोधाचा वणवा पसरला. कन्हैयालाल यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्फ्यू असूनही प्रचंड गर्दी उसळली.

पोलिसांनी केली नाही कारवाई
कन्हैयाच्या दोन्ही मुलांनी सांगितले की, वडिलांना धमक्यांचे फोन येत होते. पोलिसांकडे तक्रार केली, पण कारवाई झाली नाही. पत्नी म्हणाली, मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा हे लोक अनेक लोकांना मारतील.

2012 मध्ये रतलाम येथे बनवली अलसुफा संघटना
अलसुफाची स्थापना 2012 मध्ये रतलाम येथे झाली. एनआयएने 2015 मध्ये याचा प्रमुख असजदला अटक केली. 2017 मध्ये रतलाम हत्याकांडात त्याच्या 8 लोकांना अटक झाल्यानंतर संघटना तुटली. या वर्षी ती पुन्हा सक्रिय झाली. रियाज भिलवाडा व गौस राजसमंद येथील आहे. दोघे उदयपूरमध्ये भाड्याने राहत होते. रियाज आधी फायनान्स कंपनीत होता. गौसला भेटल्यानंतर मशिदीत जाऊन खिदमत करू लागला. दोघे धर्माच्या नावावर युवकांचे ब्रेन वॉश करू लागले. गौस वेल्डिंगचे काम करतो.
अजमेर दर्ग्यात पोहोचल्यानंतर आणखी एक व्हिडिओ व्हायरल करणार होते. रीयाज आणि गौसकडे 2611 नंबरची दुचाकी आहे. याचा 2008 च्या मुंबई हल्ल्याशी संबंध आहे का, हे तपासले जात आहे. हत्येनंतर दोघे या दुचाकीवरून पळाले होते. देवगड व भीम पोलिसांनी दोघांना 40 किमी पाठलाग करून पकडले. रियाजचा भाऊ राजसमंदच्या भीम येथील मशिदीत मौलाना आहे. सूत्रांनुसार त्याचे संबंध कराचीतील अतिरेकी संघटना पीएफआयशी आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !