नोटीस बजावताच भुसावळातील महसूल प्रशासनाला जाग : दोन वाळूचे डंपर जप्त


भुसावळ : शहरात अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर वाळू येत असताना कारवाई होत नसल्याने जिल्हाधिकारी यांनी अवैध वाळू प्रकरणी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना कारणे दाखवा नोटिस बजावली होती. यानंतर महसूल विभागातर्फे शहरातील विविध भागात वाळूचे साठे शोध मोहिम सुरू केली असून बुधवारी 35 ब्रास वाळू जप्त केली असून दोन डंपर पकडल्याने अवैध वाळू वाहतूकदार धास्तावले आहेत. प्रत्येकी दोन लाखापेक्षा जास्त दंडाची रक्कमेची नोटिस बजाविण्यात आली आहे. यामुळे अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांसह साठेबाजामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भुसावळात जनरल तिकीट सुविधा सुरू होताच पहिल्याच दिवशी रेल्वे मालामाल

यांनी केली कारवाई
प्रभारी तहसीलदार अंगद आसटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी, तलाठी यांनी शहरातील अवैध वाळूचे साठे शोध मोहिम राबविणे सुरू केले आहे. यात डी.एल.हिंदी हायस्कूल येथे 15 ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे तर तालुक्यातील टहाकळी येथे स्मशानभुमीत 20 ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे. यामुळे जेथेही काम सुरू आहे, तेथे सुध्दा वाळूची चौकशी केली जात आहे.


दोन डंपर जप्त
शहराजवळील खडका चौफुली जवळ बुधवारी दुपारी एकच्या सुमारास तहसीलदार आसटकर यांच्यासह मंडळाधिकारी सतीश इंगळे, विनोद बारी, पवन नवगाळे, दिलीप पवार यांनी वाळूने भरलेले डंपर (एमएच 04 बीजी 42 70) ही गाडी ताब्यात घेत मालक डीगंबर सोनवणे यांना 2 लाख 79 हजार रूपयांच्या दंडाची नोटिस पाठविली आहे. तर दुसरी गाडी डंपर (एमएच 19 सीवाय 2122) ही सुध्दा खडका चौफुलीजवळच पकडली आहे. याप्रकरणी मनोज पाटील यांना तहसीलदार यांनी 2 लाख 53 हजार रूपये दंडाची नोटिस बजावली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !