दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ : पतीसह पाच जणांवर गुन्हा
यावल : शहरातील गणपती नगरातील माहेर असलेल्या 32 वर्षीय विवाहितेचा चारीत्र्यावर संशय घेत व बियरबार टाकण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये आणावे यासाठी पतीसह कुटुंबियांनी छळ केला. याप्रकरणी यावल पोलिसात पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा
जयश्री गोपाल चौधरी या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह गारखेडा ता.जामनेर येथील गोपाल धनराज चौधरी यांच्याशी 3 मार्च 2016 रोजी झाला. त्यांना अडीच वर्षांचा मुलगा आहे. गोपाल चौधरी हॉटेलमध्ये बिअरबारचा परवाना घेण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये आणावे, अशी मागणी पत्नीकडे केली. ते पैसे न दिल्याने गोपाल चौधरी व कुटुंबांनी जयश्री चौधरी यांचा छळ सुरू केला. 26 एप्रिल 2022 त्यांना माहेरी सोडताना अंगावरील सर्व दागिने काढून घेतले मात्र सासरी नांदायला जाण्यासाठी जयश्री चौधरींनी जळगाव येथील महिला दक्षता समितीकडे अर्ज केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पती गोपाल धनराज चौधरी, सासरे धनराज चौधरी, सासू कल्पना चौधरी, दिर योगेश चौधरी, राहुल चौधरींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
