A youth from Jalke-Vasantwadi drowned in a lake मासे पकडताना तरुणाचा तलावात बुडून मृत्यू


Young man drowns in pond while Fishing जळगाव : मासे पकडण्यासाठी तलावावर गेलेल्या जळके-वसंतवाडी येथील 35 वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी उघडकीला आली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संजय पंडित मोरे (35, जळके वसंतवाडी, ता.जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

उदयपूरातील टेलर कन्हैयालाल हत्याकांडाचे पाकिस्तान कनेक्शन 

मासे पकडताना बुडाल्याने मृत्यू
जळगाव तालुक्यातील जळके वसंतवाडी येथील रहिवाशी संजय मोरे हा तरूण आपल्या आईवडील, भाऊ व पत्नीसह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवार, 28 जून रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास तो शिरसोली शिवारातील तलावात मासे पकडण्यासाठी गेला होता. तलावात गाळ असल्याने त्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. इकडे संजय घरी न आल्याने त्याचे कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला परंतू तो कुठेही आढळून आला नाही. बुधवारी 29 जून रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह तलावाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे जितेंद्र राठोड, जळके वसंतवाडीचे पोलीस पाटील संजय चिमणकारे, शिरसोली येथील पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह बाहेर काढून सायंकाळी सात वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


नोटीस बजावताच भुसावळातील महसूल प्रशासनाला जाग : दोन वाळूचे डंपर जप्त


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !