चोरवड येथील विवाहिता बेपत्ता
रावेर : तालुक्यातील चोरवड येथील सरलाबाई विलास सोनवणे (35, चोरवड, ता.रावेर) या मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गावातून अचानक बेपत्ता झाल्या. या प्रकरणी रावेर पोलिसात विलास रतीलाल सोनवणे (44) यांनी दिलेल्या खबरीनुसार हरवल्याची नोंद करण्यात आली. उंची पाच फूट, रंग गव्हाळ, चेहरा लांबट, अंगात काळ्या रंगाची साडी व काळ्या रंगाचे ब्लाऊज आहे. तपास नाईक सुनील वंजारी करीत आहेत.