Eknath Shinde Will Be The New Chief Minister Of the State मोठी बातमी : एकनाथ शिंदे होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री
Eknath Shinde will be the new Chief Minister of the State मुंबई : शिवसेनेतील नाराज आमदारांनी बंड केल्याने राज्यातील आघाडी सरकार कोसळताच राज्यात हालचाली गतिमान होवून फडणवीस सरकार सत्तेवर येईल, असे आडाखे बांधले जात होते तर मंत्री मंडळाची कथित यादीही व्हायरल झाली मात्र आता भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (BJP leader Devendra Fadnavis) यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील, अशी मोठी घोषणा केली आहे शिवाय या सरकारला माझे समर्थन असेल, असे ते म्हणाले आहे.
त्यांनी केला जनतेचा विश्वासघात
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची युती होती. या युतीच्या माध्यमातून भाजपानं 105 जागा आणि शिवसेनेने 56 जागा जिंकल्या. जवळपास 161 युती आणि अपक्ष मिळून 170 बहुमत आमच्याकडे होते. भाजपा-शिवसेना युतीचं सरकार तयार होईल. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजपाचा मुख्यमंत्री बनेल अशी घोषणा केली होती. परंतु दुर्दैवाने त्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर शिवसेना आणि त्यांचे नेते यांनी वेगळा निर्णय घेतला. विशेषत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आजन्म ज्यांचा विरोध केला अशा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली आणि भाजपाला बाहेर ठेवले. हा खरेतर जनमताचा अपमान होता. जनतेचा कौल भाजपा-शिवसेनेला होता. परंतु त्याचा अपमान करून महाविकास आघाडी अस्तित्वात आली.

तत्कालीन सरकारने दाऊदशी संबंध असलेल्या मंत्र्याला पाठीशी घातले
फडणवीस (BJP leader Devendra Fadnavis) म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची नवीन विकास योजना नाही. भ्रष्टाचारात 2 मंत्री जेलमध्ये जाणे. एकीकडे मा.बाळासाहेब ठाकरेंनी सातत्याने देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. दुसरीकडे त्याच्याशी संबंध ठेवलेल्या मंत्र्यांला पाठिशी घातले. दररोज सावरकरांचा अपमान, हिंदुत्वाचा तिरस्कार झाला. जोपर्यंत विश्वासदर्शक ठराव समंत केल्याशिवाय कॅबिनेट घेता येत नाही. ते प्रस्ताव मंजूर केले. ते वैध मानले जाणार नाहीत. पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्हाला तो निर्णय घ्यावाच लागणार आहे असंही फडणवीसांनी सांगितले.
ही तर हिंदूत्वाची लढाई
फडणवीस म्हणाले की, आम्ही लोकांवर निवडणुका लादणार नाही. भाजपा-शिंदे गटाचे आमदार आणि 16 अपक्ष, घटक पक्षांचे आमदार आमच्यासोबत आले आहेत. आणखी काही आमदार आमच्यासोबत येत आहे. आम्ही सत्तेच्या पाठिशी नाही. कुठल्यातरी मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही काम करत नाही. ही तत्वाची, हिंदुत्वाची आणि विचारांची लढाई आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपा समर्थन देईल.