The stone door of the historic bastion collapsed in Amalner अमळनेरात ऐतिहासीक बुरूजाचा दगडी दरवाजा कोसळला : दोघे जखमी
The stone door of the historic bastion collapsed in Amalner : two injured अमळनेर : शहरातील ऐतिहासीक बुरूजाचा दगडी कोसळल्यानंतर दोन कामगार जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडल्याने शहरात खळबळ उडाली. शकूर मिस्त्री व कादीर मिस्तरी अशी जखमींची नावे आहेत.
दोन वर्षांपासून कासवगतीने काम
गेल्या दोन तीन वर्षांपासून दगडी दरवाजाचे काम कासवगतीने सुरू आहे, हेच काम सुरू असताना अचानक गुरुवारी सकाळी एका बाजूचा बुरुज पूर्णपणे कोसळला आहे. दरम्यान सुदैवाने कोणतेही जीवित हानी झालेली नसली तरी संबंधित ठेकेदार व पुरातत्व विभाग मोठी दुर्दैवी घटना होण्याची वाट तर पाहत नाहीये ना? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह
कोट्यवधी रुपये खर्च करून एवढ्या धीम्या गतीने सुरू असलेले काम जर पूर्ण होण्याआधी असे काही महिन्यातच कोसळत असेल तर हे काम खरच गुणवत्ता पूर्वक होत असेल का? असा प्रश्न असून अमळनेरची ऐतिहासिक ओळख असलेल्या दगडी दरवाजाची साडेसाती संपणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.