जुना वाद उफाळला : तरुणाच्या डोक्यात मारली काचेची बाटली


An Old Argument Erupted : A Glass Bottle hit the Young man In The Head जळगाव : शहरातील बी.जे. मार्केट जवळील रेडक्रॉस सोसायटीसमोर मागील भांडणाच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली मारून दुखापत करण्यात आली. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठी बातमी : एकनाथ शिंदे होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री 

जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा
जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश उर्फ बाळा खंडू बनसोडे (27, महावीर नगर, दूध फेडरेशन, जळगाव) हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. खाजगी हॉस्पिटल येथे डॉक्टर म्हणून नोकरीला आहे. मंगळवार , 28 जून रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास अविनाश बनसोडे हा शहरातील बी.जे. मार्केट जवळील रेडक्रॉस सोसायटीसमोर कामाच्या निमित्ताने आलेला होता. दरम्यान मागील भांडणाच्या कारणावरून राजेश विनोद बनसोडे व त्याच्या सोबत असलेले त्याचे तीन अनोळखी मित्र यांनी शिवीगाळ करून काचेची बाटली डोक्यात मारली आणि फायटरने डोळ्यावर वार करून गंभीर दुखापत केली. बुधवार, 29 जून रोजी दुपारी साडेतीन वाजता राजेश बनसोडे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून राजेश विनोद बनसोडे आणि त्याच्या सोबत असलेले त्याचे तीन मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक संदीप पाटील करीत आहे.


अमळनेरात ऐतिहासीक बुरूजाचा दगडी दरवाजा कोसळला : दोघे जखमी


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !