घरासाठी जावयाने केला सासु-सासर्यांचा खून
Son-in-law kills mother-in-law for house हिंगणा : कुर्हाडीचे घाव घालून जावयाने आपल्या सासुसह सासर्याची हत्या केली. ही धक्कादायक घटना एमआयडीसी (ता.हिंगणा, जि.नागपूर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नीलडोह येथे घडली. आरोपीला जावयाला पोलिसांनी अटक केली. भगवान बाळकृष्ण रेवारे (65) व पुष्पा भगवान रेवारे (62) असे मृत सासरा व सासूचे नाव आहे. दरम्यान, सासर्याने त्याच्या बकर्या विकून आपल्याला पैसे द्यावे व त्याचे घर आपल्या नावे करून द्यावे या मागणीसाठी हे हत्याकांड घडल्याचे सूत्रांनी सांगितले.
पत्नीसह मुलगीही जखमी
आरोपीने जावयाने सासु-सासर्यांवर हल्ला करीत असताना भांडण सोडवण्यासाठी मध्ये आलेली पत्नी कल्पना (40) व मुस्कान संतलाल मंडलीय (15) हदेखील जखमी झाले. मुस्कान हे आरोपीची सावत्र मुलगी आहे. नरमू सीता यादव असे अटकेतील आरोपी जावयाचे नाव आहे. हे सर्व जण अमरनगर, नीलडोह, ता. हिंगणा येथे राहतात. नरमू हा वाहनचालक म्हणून काम करायचा व त्याच्या सासर्याच्या घरी राहायचा.
