उपमुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेताच अमृता फडणवीस यांनी केले ‘हे ट्वीट’


मुंंबई : राजकीय नाट्यानंतर . गुरूवारी भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. फडणवीस यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर राजकीय विश्‍लेषकांनी त्यातून भाजपाने एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याचे विश्‍लेषणही केले तर राज्यातील राजकारणावर नेहमीच ट्टीट करून चर्चेत असलेल्या अमृत फडवणीस यांनीदेखील याबाबत ट्विट केले. पण हे ट्वीट अतिशय सरळ-साधे व अत्यंत औपचारिक असल्याप्रमाणे दिसून आले. ‘आपले (महाराष्ट्राचे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन आणि वाटचालीसाठी शुभेच्छा’, असे औपचारिक ट्विट करत त्यांनी दोघांचे अभिनंदन केले.

https://twitter.com/fadnavis_amruta/status/1542541746722447360?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1542541746722447360%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fmaharashtra%2Famruta-fadnavis-reaction-on-eknath-shinde-cm-devendra-fadnavis-deputy-cm-oath-taking-see-tweet-a747%2F


अप्रत्यक्षपणे दिले संकेत
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या गेल्या दोन-अडीच वर्षांत राजकीय विषयांवर मत मांडताना दिसल्या. उद्धव ठाकरे यांचे सरकार आल्यानंतर अमृता फडणवीस सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसल्या. एकनाथ शिंदे यांचे बंड सुरू झाल्यावरही त्यांनी बर्‍याच वेळा टीका केली. पण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार नसल्याचे संकेत अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणेच दिले होते, अशी चर्चा झाली. कारण अमृता फडणवीस या देशाबाहेर काही कामानिमित्त गेल्या होत्या. राज्यात सत्तेची उलथापालथ सुरू असताना फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार अशी चर्चा रंगल्यानंतरही अमृता फडणवीस या देशाबाहेरच राहिल्या. अमृता यांचा राजकारणातील एकंदर रस पाहता फडणवीस मुख्यमंत्री होणार असते तर अमृता फडणवीस या लगबगीने भारतात आल्या असत्या. पण त्या भारतात परतल्या नाहीत, यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे संकेत दिले होते का? अशी चर्चा सध्या करण्यात येत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !