भुसावळ विभागातील 75 कर्मचारी सेवानिवृत्त
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून गुरुवार, 30 रोजी तब्बल 75 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत कर्मचार्यांना रेल्वे प्रशासनातर्फे तब्बल 20 कोटी 71 लाख रुपये कर्मचार्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. रेल्वेच्या कृष्णचंद्र सभागृहात सेवानिवृत्त रेल्वे कर्मचार्यांना निरोप देण्यात आला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी विरेंद्र वडनेरे यांनी केले. सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सन्मान व पी.पी.ओ.फोल्डर डीआरएम एस.एस.केडीया यांच्याहस्ते देण्यात आले. डीआरएम एस.एस.केडिया, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक रुकमैया मीना, नवीन पाटील, वरीरष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी मार्गदर्शन केले तसेच कर्मचार्यांना शुभेच्छा दिल्या. आभार सहाय्यक कार्मिक अधिकारी बी.एस.रामटेके यांनी मानले. सेटलमेंट आणि लेखा विभागातील तसेच सर्व कल्याण निरीक्षक व कर्मचार्यांनी आदींनी परीश्रम घेतले.
