भुसावळात उद्या पोलिस प्रशासनातर्फे तक्रार निवारण दिन
नागरीकांच्या प्रलंबित तक्रारी सुटणार : सर्व अधिकारी राहणार उपस्थित
भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात शनिवार, 2 रोजी सकाळी दहा ते दोन दरम्यान तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या संकल्पनेतून या दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. भुसावळ शहर पोलीस स्टेशन, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन,त्याचप्रमाणे भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील ज्या नागरीकांनी पोलीस स्टेशनकडे काही तक्रार अर्ज केलेले असतील त्यांनी तसेच नागरीकांच्या कोणत्याही दखलपात्र वा दखलपत्र स्वरूपाच्या तक्रारी असतील अशा नागरीकांनी शनिवारी सकाळी दहा ते दोन या दरम्यान भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व अधिकारी राहणार हजर
शनिवारच्या तक्रार दिन कार्यक्रमात संबंधित तपासी अंमलदार त्याचप्रमाणे सर्व पोलीस अधिकारी उपस्थित असतील. ज्या ही नागरीकांच्या पोलीस विभागाकडे यापूर्वी काही तक्रारी प्रलंबित असतील त्यांनी त्याचप्रमाणे ज्यांच्या पोलिस विभागाशी निगडित तक्रारी असतील त्यांनी उद्याच्या तक्रार निवारण दिवशी समक्ष व प्रतिनिधी मार्फत हजर रहावे असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.
