कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार
Rape of a young woman threatening to kill her family नाशिक : वडिल आणि भावास जीवे मारेल, अशी धमकी देत तरुणीवर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 ऑक्टोबर 2021 ते 30 जून 2022 दरम्यान ही घटना घडली तर युवतीस डांबून ठेवण्यात आल्यानंतर युवतीने य प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर कुणाल जगताप (रा.मोरे हॅास्पिटल समोर, पवननगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सलगी वाढवत केला अत्याचार
आरोपी कुणालने पीडितेशी ओळख वाढवून तरुणीस आपल्या घरी नेले. यावेळी त्याने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. युवतीवर बलात्कार करून संशयिताने आपल्या घरात डांबून ठेवल्याने हा प्रकार पोलिसात पोहोेचला. अधिक तपास पीएसआय पावरा करीत आहेत.
