जळगावातील स्टेट बँकेला सात लाखांचा गंडा : एकाविरोधात गुन्हा
Rs 7 lakh bribe to State Bank of Jalgaon: Crime Against one जळगाव : जळगावातील एकाने चक्क स्टेट बँकेलाच सात लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी बँकेच्या अधिकार्यांनी बँकेचे हप्ते न भरल्याची चौकशी केली असता संशयीताने सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर गुरुवारी, 30 जून रोजी दुपारी जिल्हा पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पवन अमरनाथ मिश्रा असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे.
भंगारातील विमानाचे अवशेष मिळवून देण्याच्या नावाखाली दिड कोटीत ठगवले : एकाला अटक
सात लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा
जळगाव शहरातील गायत्रीनगरात राहणारा पवन अमरनाथ मिश्रा याने बनावट दस्तावेज खरे असल्याचे भासवून स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत कर्ज प्रकरण टाकले होते. बँकेने सर्व दस्तावेजांनी कागदपत्रांची पळताळणी करीत मिश्रा याला सात लाखांचे कर्ज मंजूर केले व 3 फेब्रुवारी 2022 रोजी अदा केले. बँकेकडून कर्जप्राप्ती झाल्यानंतर कर्जाच्या हप्त्याच्या तारखा सुरु झाल्या, मात्र कर्जाचे हप्तेच भरले जात नसल्याने बँकेतून संबधीत ग्राहकाला संपर्क करण्यात आला तर मोबाईल बंद असल्यामुळे घर गाठून चौकशी केली तर घर सुध्दा बंद होते. अखेर त्याची माहिती घेतली असता तो अनेक दिवसांपासून घरीच आलेला नसल्याचे शेजारच्यांनी सांगताच बँक अधिका-यांनी याबाबत वरीष्ठांना कळवले. गुरूवारी बँक मॅनेजर सिसीर पटकनायक यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिल्यावरुन पवन अमरनाथ मिश्रा याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार करत आहेत.
