Eknathrao Khadse ज्युनिअरच्या हाताखाली फडणवीस काम करतील असे वाटले नव्हते : एकनाथराव खडसे


I did not think that Fadnavis would work under Junior: Eknathrao Khadse मुंबई : राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली. फडणवीस यांनी पदभार घेतल्यानंतर खडसे यांनी त्यांच्यावर टिकेचे बाण चालवले. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे आपल्या ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील, असे स्वप्नातही वाटले नव्हते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने दोघांना माझ्या शुभेच्छा. मागच्या सरकारपेक्षा अधिक चांगले काम त्यांनी या ठिकाणी करावे आणि महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता यांनी करावी. घडलेले नाट्य हे अनअपेक्षित आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याची खूप मोठी अपेक्षा पूर्ण झाले नाही, परीस्थितीनुसार त्यांनी स्वीकारले, असे एकनाथ खडसे (Eknathrao Khadse) म्हणाले.

खोचक शब्दात टोला
महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी या नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknathrao Khadse)  यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देताना देवेंद्र फडणवीस यांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस हे आपल्या ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील, असे स्वप्नातही आपल्याला वाटले नव्हते, असेही ते (Eknathrao Khadse) म्हणाले.


सर्वांच्या साथीने राज्याचा विकास
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर, हा बाळासाहेबांच्या विराचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा विजय असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. राज्याचा विकास, सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले जाईल. सर्वांना सोबत, विश्वासात घेऊन काम केले जाईल. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसही सोबत आहेत. सर्वांच्या साथीनं विकासाचा गाडा पुढे नेण्याचे काम आम्ही करू, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. राज्याला पुढे नेण्यासाठी, विकासाठी कायम प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी (Eknathrao Shinde)  स्पष्ट केले.

कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !