फैजपूरात पंचकल्याणक महोत्सवानिमित्त निघालेल्या मिरवणुकीने वेधले लक्ष
दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन : 20 जोडप्यांनी केली पूजा
फैजपूर : शहरात मुनी श्री विशेष सागर महाराज यांच्या सानिध्यातील पंचकल्याणक कार्यक्रमातील दुसरा दिवस जन्म कल्याणक म्हणून साजरा करण्यात आला. जन्मकल्याणक दिनानिमित्त सुमंगल लॉन पासून लक्ष्मी नगर, खंडोबा वाडी, बस स्टॅन्ड मार्गे मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, 45 मुलांवर उपनयन संस्कार करण्यात आले तर इंद्र-इंद्रयानीत 20 जोडप्यांनी पूजा केली.
समाजातच व्हावेत विवाह
मुनीश्री विशेष सागर महाराज म्हणाले की, प्रत्येकाने नियमित मंदिरात जाऊन देवदर्शन घेवून आई-वडिलांची सेवा करावी तसेच साधू संतांचे दर्शन घ्यावे. मुला-मुलींनी आई वडिलांचे नाव समाजात उंच शिखरावर न्यावे तसेच मुला-मुलींचे लग्न समाजातच करावे. निर्व्यसनी राहून आई-वडिलांना विसरू नये, असे विशेष सागर महाराज म्हणाले. प्रसंगी पंडित संजय (चिंचोली), पंडित शांतीलाल (अकोला) धार्मिक विधी करत आहे. संगीतकार राकेश जैन (इंदोर), मंच कलाकार चक्रेश जैन (सोनजा, उ.प्र. )कार्यक्रमाला संगीत देत आहे. कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी, असे फैजपूर जैन समाजातर्फे करण्यात आले आहे.
