स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भुसावळात रेल्वेतर्फे रॅली

विभागात रॅलीद्वारे जनजागृती : 45 दिवसानंतर रॅली दिल्लीत परेडमध्ये सहभागी होणार


भुसावळ : भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करण्यासाठी सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असताना मध्य रेल्वे भुसावळ विभागानेही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भुसावळ ते मुंबई दुचाकी रॅलीचे शुक्रवारी आयोजन केले. डीआरएम कार्यालयापासून शुक्रवारी सकाळी दुचाकी रॅलीचा शुभारंभ झाला. प्रसंगी डीआरएम एस.एस.केडीया यांनी रॅलीला झेरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास रेल्वेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच एडीआरएम नवीन पाटील, एडीआरएम रूकवैय्या मीना, रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त क्षितीज गुरव आदींची उपस्थिती होती.


45 दिवसांच्या प्रवासानंतर रॅली पोहोचणार दिल्लीत
रॅलीत दहा दुचाकींवर 20 रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. भुसावळातून निघालेली दुचाकी रॅली खंडवा, नेपानगर, बर्‍हाणपूर, मलकापूर. शेगाव, अकोला, अमरावती, बडनेरा, जळगाव, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव या स्थानकांवरून पुढे नासिक रोड येथे पोहोचेल व तेथून ती मुंबईला रवाना होईल व मुंबईनंतर रॅली दिल्ली पोहोचणार असून 15 ऑगस्ट रोजी 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होईल. या मोटारसायकल रॅलीचे नेतृत्व जेनेरीक बेनी पी.रशद मीना करीत आहेत.

ज्युनिअरच्या हाताखाली फडणवीस काम करतील असे वाटले नव्हते : एकनाथराव खडसे


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !