नुपूर शर्मांची सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल केल्यानेच अमरावतीच्या उमेश कोल्हेंची हत्या
Umesh Kolhe of Amravati was killed after Nupur Sharma’s post went viral on social media अमरावती : उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यानेच झाल्याची माहिती पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली आहे. दरम्यान, केंद्राने या हत्येचा तपास आता एनआयएकडे सोपवण्यात आला आहे.
सोशल मिडीयावर पोस्ट अन झाल हत्या
अमरावतीच्या उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यानेच झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अमरावतीतील या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेत या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. पोलिस उपायुक्त विक्रम साळी म्हणाले, उमेश कोल्हे खून प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला. त्यात प्रथमदर्शी उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर जी पोस्ट केली त्याच संबंधाने हा गुन्हा घडल्याचं स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
