Dhoom Style Gold Chain Snaching पायी चालणार्‍या वृद्धेच्या गळ्यातून धूम स्टाईल सोनसाखळी लंपास


Dhoom Style Gold Chain lamp from the neck of an old man walking जळगाव : पायी चालणार्‍या वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरट्याने धुमस्टाईल लांबवली. ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील गुरूदत्त कॉलनीतील स्वामी समर्थ मंदीराजवळ ही घटना घडल्याने शहरात पुन्हा धूम स्टाईल चोर्‍या करणारी टोळी सक्रिय झाल्याची चर्चा आहे.

किनगावच्या महिलेस लॉटरीच्या आमिषाने चार लाखांचा गंडा

धूम स्टाईल सोनसाखळी लांबवली
शोभा हसमुख जाणी (70, विष्णू नगर, गणेश कॉलनी, जळगाव) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार, 2 जुलै रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास मंदीरातून घरी जाण्यासाठी शिवकॉलनी स्टॉपवर उतरल्या. गुरूदत्त कॉलनीतील स्वामी समर्थ मंदीराजवळून घरी पायी जात असतांना त्यांच्या मागून दोन अनोळखी व्यक्ती दुचाकीवर आले. त्यांनी हेल्मेट घातलेले होते. मागे असलेल्या एकाने शोभा जाणी यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची 30 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत तोडून पळ काढला. त्यांनी आरडाओरड केली असता परीसरातील नागरीक जमा झाले. तोपर्यंत दोन्ही चोरटे पसार झाले होते. वृध्द महिलेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


कोंबडी पळाली…अन् तुटलेला पाय घेवून परतली ; वाद पोहोचला यावल पोलिस ठाण्यात ; जाणून घ्या नेमकी बातमी


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !