BJP’s Rahul Narvekar elected as Assembly Speaker भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड
BJP’s Rahul Narvekar elected as Assembly Speaker मुंबई : महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव करीत विधानसभा अध्यक्षपदी भाजप व शिंदे गटाचे उमेदवार राहूल नार्वेकर यांनी बाजी मारली. त्यांना तब्बल 164 मते मिळाल्याने सत्ताधार्यांच्या पाठीशी भक्कम बहुमत असल्याचे आज सिद्ध झाले.
राजन साळवी यांचा पराभव
महाविकास आघाडीतर्फे राजन साळवी तर भाजप व शिंदे गटातर्फे राहुल नार्वेकर यांच्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली. ाजपचे ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत पाटील यांनी विधानसभाध्यक्षपदी राहूल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. गिरीश महाजन यांनी त्यांना अनुमोदन दिले. यात आवाजी मतदानाने त्यांनी निवड जाहीर करण्यात आली. मात्र विरोधकांनी आवाजी मतदानाची मागणी केली असून उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी याला होकार दिला. यामुळे आता राहूल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यात प्रत्यक्ष मतदान करण्यात आले. विधानसभाध्यक्षपदी राहूल नार्वेकर यांना 164 मते मिळाल्याने निवड करण्यात आली तर राजन साळवी यांना 107 मते मिळाली.

किनगावच्या महिलेस लॉटरीच्या आमिषाने चार लाखांचा गंडा
बहुजन आघाडीचे नार्वेकरांना मतदान
आजच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या तीन तर मनसेच्या एक उमेदवाराने राहूल नार्वेकर यांना मतदान केले. तर समाजवादी पक्षाचे दोन आमदार हे तटस्थ राहिले. सोमवार, 4 जुलै रोजी शिंदे सरकार बहुमत चाचणी घेणार आहे. याआधीच विधानसभाध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचे उमेदवार राहूल नार्वेकर यांनी बाजी मारल्याने उद्याच्या चाचणीतही शिंदे सरकार सहजपणे बहुमत सिध्द करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आजच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी राजन साळवी यांना मतदान करण्यासाठी काढलेला व्हीप हा एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी धुडकावून लावल्याचे देखील दिसून आले आहे.