सावरला गावातील किराणा दुकान पेटवले : चौकडीविरोधात गुन्हा


Savar set fire to village grocery shop: Crime against quartet जामनेर : चौकडीने किराणा दुकानाला पेट्रोल टाकून आग लावल्याची घटना जामनेर तालुक्यातील सावरला येथील बसस्थानकाजवळ घडली होती. या प्रकरणी जामनेर पोललिस ठाण्यात चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
विकास नाना पाटील (31, सावरला, ता.जामनेर) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. किराणा दुकान चालवून आपल्या उदरनिर्वाह करतो. 15 जून रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास गावातील संशयीत आरोपी मुकेश गजमल कोळी, अविनाश विश्वनाथ कोळी, प्रमोद नारायण पाटील आणि सागर भगवान पाटील (सर्व रा.सावरला, ता.जामनेर) यांनी खोडसाळपणे विकास पाटील यांच्या किराणा दुकानावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. या आगीत सुमारे 11 लाखांचे नुकसान झाले. याप्रकरणी विकास पाटील यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल. पुढील तपास हवालदार जनार्दन सोनोने करीत आहे.


सोशल मिडीयावर माजी मंत्री एकनाथराव खडसेंची बदनामी : एकाविरोधात गुन्हा 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !