मध्यरात्री महिलेचा विनयभंग : तरुणाविरोधात गुन्हा
Midnight Molestation Of a Woman: Crime Against a Youth धरणगाव : झोपेत असलेल्या महिलेचा मध्यरात्रीच्या सुमारास तरुणाने विनयभंग केला. ही घटना धरणगाव तालुक्यातील एका गावात घडली. याबाबत धरणगाव पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तरुणाविरोधात गुन्हा
धरणगाव तालुक्यातील एका खेड्या गावात 45 वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार, 1 जुलै रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर राहणारा पंकज तुकाराम पाटील (26) या तरूणाने महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी महिलेने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने आरोपी पंकज पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील करीत आहे.
